एक्स्प्लोर

Ganeshotsav DJ News : उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स

Ganeshotsav DJ Ban News : डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवरील बंदीचं लोण आता राज्यभरात पसरत असल्याचे दिसत आहे. राज्यात कुठे कुठे डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवरील बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेऊ.

Ganeshotsav DJ Ban News : आगामी गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची मोठी तयारी सर्वत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच यंदाही राज्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डीजे, ध्वनीक्षेपक आणि लेझर लाईट, धांगडधिंगा हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, नागपुरात गणेश मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डीजे (DJ) आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर नागपुरात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी 3 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे आगामी सणांमध्ये डीजेच्या दणदणाटाला आळा बसणार आहे. अशातच या डीजे (DJ) आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवरील बंदीचं लोण आता राज्यभरात पसरत असल्याचे दिसत आहे. राज्यात कुठे कुठे डीजे (DJ) आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवरील बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेऊ.

Sangli : सांगलीत डॉल्बीच्या आवाजाची प्रशासन, पोलीस दलाकडून चाचपणी, नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हे आणि साहित्य जप्त होणार

सांगलीत गणेशोत्सवात डीजे ध्वनिवर्धकांचा नियमबाह्य वापर कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने ठरवून दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दयामया न दाखवता कडक कारवाई केली जाईल, तसेच संबंधित डीजे चालकांचे साहित्य थेट जप्त करण्यात येईल, असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिला आहे. सांगलीत डॉल्बीच्या आवाजाची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी चाचपणी केली. पोलिस यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या ध्वनिमापक यंत्रांद्वारे आवाजाची मर्यादा तपासली जाईल. कोणत्याही मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Tushar Doshi Sangli SP: डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या, डीजे डॉल्बी ही हिंदू धर्माची संस्कृती नाही

आगामी गणेशोत्सवामध्ये डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी गणेश मंडळाना केले आहॆ. याचबरोबर डीजे, डॉल्बी ही हिंदू धर्माची संस्कृती नाही, असे सांगायला सुद्धा दोषी विसरले नाहीत.

सांगलीतील खरे क्लब हाऊसमध्ये जिल्ह्यातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, शांतता मोहल्ला समिती समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना एसपी दोषी बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मैनाक घोष होते. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, महापालिका आयुक्त संजिता महापात्र, वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल बोकील, पोलीस उपधीक्षक अजय कोकाटे, परिवहन विभागाचे राहुल जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई ही होणारच, असे सांगत यंदाच्या उत्सवात एक मंडळ एक अंमलदार ही संकल्पना राबविली जाणार असल्याचेही एसपी तुषार दोषी यांनी सांगलीत गणेश मंडळ आढावा बैठकीत सांगितले.

Kolhapur Police : गणेश आगमन आणि विसर्जना दिवशी दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास परवानगी

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार गणपती बाप्पाच्या आगमनादिवशी आणि विसर्जना दिवशी दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास कोल्हापूर पोलिसांची परवानगी असेल. मात्र ध्वनी मर्यादा ओलांडल्यास संबंधित सार्वजनिक गणेश मंडळावर कारवाई केली जाणार आहे.

Solapur: सोलापुरात गणेशोत्सवात डॉल्बी व लेझरवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सोलापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर नंतर आता सोलापुरात (Solapur News) देखील डॉल्बी आणि लेजर लाईटवर बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. 13 ते 26 सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी आणि लेजर लाईट वापरावर बंदीचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.  सोलापुरात यंदाच्या गणेशोत्सवात ही डिजे आणि लेजर लाईट्स वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषण कायद्याचे उललंघन झाल्यास स्पीकर थेट जप्त करणार, अशा सूचना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या साउंड आणि लाईट्स व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत.

Navi Mumbai DJ Ban: नवी मुंबईतही गणेशोत्सव काळात डीजे लावण्यास बंदी

नवी मुंबई- गणेशोत्सव काळात डीजे लावण्यास नवी मुंबई पोलीसांकडून परवानगी दिली जाणार नाही. नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही शहरात ही नियमावली लागू असेल. डी जेच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईट मुळे डोळ्यांना होणारी इजा लक्षात घेता गणेश उत्सव मंडळांनी डीजे लावू नयेत, असे आवाहन नवी मुंबई पोलीसांकडून करण्यात आले आहे.

Nagpur News: नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी

नागपूर शहरात मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालण्यात आली आहे. काल (3 सप्टेंबर) मध्यरात्री 12 वाजेपासून ते 1 नोव्हेंबर माध्यरात्रीपर्यंत डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंद राहणार आहे. आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी या निर्णयाचे स्वागत केलं असले तरी भाजपमधील इतर नेत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Dhule: धुळ्यातही डीजे बंदीचा निर्णय, निर्णयाविरोधात डीजे व्यावसायिक आक्रमक

धुळ्यातही डीजे बंदीचा निर्णय झालाय. डीजे बंदीच्या निर्णयाविरोधात डीजे व्यावसायिक आक्रमक झालेत. तब्बल 400 ते 500 डीजे व्यावसायिकां समोर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात डीजे आणि साऊंड सिस्टीमवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे डीजे चालक-मालकांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 डीजे व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी डीजे चालक-मालकांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच डीजेचा आवाज ठेवला जाईल, अशी ग्वाही संघटनेने दिली.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार रावल यांनी डीजे व्यावसायिकांचं म्हणणं ऐकून घेतलं असून, पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. पालकमंत्र्यांच्या या आश्वासना नंतर डीजे व्यावसायिकांना आता परवानगी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे

Konkan Ganeshotsav: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीजे बंदीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

दुसरीकडे, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरी गणपतीच्या सणात डीजे बंदीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये. तीनही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासन या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. याबाबत काही निर्णय झाल्यास तो कळवला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी ‘डीजे’ वाजवल्यास कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल, असे आदेश आधीच देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळात डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान लाऊड स्पीकरला दहा पैकी चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.

Palghar: गणेशोत्सवात डीजेवर संपूर्ण बंदी नाही; मात्र आवाजाची मर्यादा निश्चित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे तसेच विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची 2 सप्टेंबर रोजी पोलीस विभागाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक, साऊंड सिस्टिम आणि डीजेच्या वापराबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात डीजेवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नसली, तरी डीजेचा आवाज शासनाने आणि न्यायालयाने निर्धारित केलेल्या मर्यादेतच ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून करण्यात आल्या आहेत. साऊंड सिस्टिमलाही ठराविक डेसिबल मर्यादेपर्यंतच आवाज ठेवता येणार आहे.

विशेषतः सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी बैठकीत दिल्या. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे बंद नाही, मात्र त्याच्या आवाजावर मर्यादा असणार हे पोलिसांच्या सूचनांमधून स्पष्ट झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget