एक्स्प्लोर

भयंकर! घरगुती उपाय म्हणत 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत अक्षरश: 65 वेळा चटके, मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर

बाळ आजारी पडल्याने नातेवाइकांनी त्या बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः 65 वेळ चटके दिले.

Amraavati: अवघ्या 22 दिवसांचं बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापवून अक्षरशः 65 वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडलीय .मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गावातून हा संतापजनक प्रकार समोर आलाय . या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले .त्यानंतर तिथून अचलपूरला नेले . आता अखेर अमरावतीमध्ये डफरीन रुग्णालयात  बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले . (Melghat)

घरगुती उपाय म्हणून बाळाला 65 वेळा चटके!

सिमोरी गावातील रहिवाशी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना 22 दिवसांचे बाळ आहे .बाळ आजारी पडल्याचं कळताच घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः 65 वेळा चटके दिले .त्यामुळे बाळाचे प्रकृती बिघडली .त्यामुळे घाबरून जाऊन बाळाला सिमोरीवरून हतरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं .त्यानंतर बाळाला हतरू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे .या घटनेची माहिती उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय . या घटनेमुळे बालमृत्यू, कुपोषणासोबतच मेळघाटातील घरगुती उपायाने किती जीवघेणे प्रकार घडू शकतात हे समोर आले आहे. 

बाळाला श्वास घेण्यास त्रास, अमरावतीत उपचार सुरु

मेलघाटमधील त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला अमरावतीला आणण्यात आल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील डॉक्टरांनी दिली.बाळ हा 21 दिवसाचा आहे.. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यामुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्याने त्याला नागपूरला रेफर केले जाऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या कुटुंब सदस्यांनी पोटाला चटके दिले असतील पण चटके गंभीर नसून श्वास घेता येत नाही ती मूळ समस्या आहे. असेही त्यांनी सांगितले.

मेळघाटात आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च होतो पण कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात हा विभाग सातत्याने अपयशी ठरलाय . कधी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने होणाऱ्या गर्भवती स्त्रियांचे मृत्यू ,अज्ञान आणि अंधश्रद्धेतून होणारे घरगुती उपायही जीव घेणे ठरत असल्याचं समोर येत आहे .शासकीय आकडेवारीनुसार मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बालमृत्यू आणि 24 मातामृत्यू झाले आहेत .मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधले गेले आहे .

हेही वाचा:

New School In Maharashtra: महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार; पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Narayan kuche Audio Clip : कुचेंचा व्हिप लक्ष्मीदर्शनाची क्लिप; पैसे वाटपाचा संवाद Special Report
Mayor Reservation Lottery Rada : महापौरपदाची 'लॉटरी' वादाची 'सोडत' Special Report
BJP vs Sahar Shaikh : सहर शेखचं ते वाक्य अन् वादाचं राजकारण Special Report
Uddhav Thackeray angry On KDMC MNS Allinace : 'मनसे' की मजबूर? संतापाचा सूर Special Report
Sarita Mhaske : देवदर्शन की वेगळं मिशन? सरिता म्हस्केंच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
Embed widget