Ratnagiri Kolhapur Railway Line :  रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या चर्चेनंतरआता कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक झाली आहे. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या कामाला आधी सुरुवात करा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण कराड रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. आता ते काम पूर्ण करुन अजितदादांना श्रद्धांजली द्या असे मत शौकत मुकादम यांनी व्यक्त केले. 

Continues below advertisement

अनेक वर्षापासून चिपळूण कराड रेल्वे मार्ग रखडला

अनेक वर्षापासून चिपळूण कराड रेल्वे मार्ग रखडला असताना रत्नागिरीकोल्हापूर मार्गाची चर्चा सुरु झाल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम आक्रमक झाले आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर देखील चिपळूण कराड रेल्वे मार्ग संदर्भात अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. चिपळूण कराड मार्गाचे काम पूर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकणवासीयां कडून श्रद्धांजली द्यावी अशी मागणी शौकत मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

रत्नागिरी-कोल्हापूर (वैभववाडी-कोल्हापूर) रेल्वे मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुमारे 108 किमी लांबीचा हा मार्ग वैभववाडीला कोल्हापूरशी जोडेल, ज्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरीमधील अंतर कमी होऊन व्यापाराला (विशेषतः आंबा व इतर मालवाहतूक) मोठी गती मिळेल आणि जैगड बंदराशी थेट जोडणी होईल असे बोलले जात आहे. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीशी थेट जोडेल, ज्यामुळे जैगड बंदराचा विकास होईल आणि आंबा, काजू, प्रक्रिया केलेला अन्न पदार्थ यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात सुलभ होईल असे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडण्यासोबतच, हा मार्ग बेळगाव, हुबळी, होस्पेट, बेलारी, विजापूर, गुलबर्गा, लातूर, परळी आणि सोलापूर यांसारख्या कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील इतर भागांनाही चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. मात्र, या रेल्वे मार्गाच्या आधी चिपळून ते कराड असा रेल्वे मार्ग पूर्ण करावा अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Palghar News: 1035 एकर जागा, 16 धक्के, 13 किमी रेल्वे मार्ग, हायवेला थेट जोडणी; पालघरमधील मुरबे पोर्ट प्रकल्प कसा असेल?