रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाची चर्चा, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक, आधी चिपळूण-कराड रेल्वे मार्ग सुरु करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या चर्चा सुरु झाली आहे. यानंतर आता कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक झाली आहे. आधी चिपळूण-कराड रेल्वे मार्ग सुरु करण्याची मागणी केली आहे.
Ratnagiri Kolhapur Railway Line : रत्नागिरी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या चर्चेनंतर आता कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक झाली आहे. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या कामाला आधी सुरुवात करा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण कराड रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले होते. आता ते काम पूर्ण करुन अजितदादांना श्रद्धांजली द्या असे मत शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.
अनेक वर्षापासून चिपळूण कराड रेल्वे मार्ग रखडला
अनेक वर्षापासून चिपळूण कराड रेल्वे मार्ग रखडला असताना रत्नागिरी कोल्हापूर मार्गाची चर्चा सुरु झाल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर देखील चिपळूण कराड रेल्वे मार्ग संदर्भात अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. चिपळूण कराड मार्गाचे काम पूर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकणवासीयां कडून श्रद्धांजली द्यावी अशी मागणी शौकत मुकादम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























