औरंगाबाद : धुळ्यातील राईनपाडा हत्याकांडातील काही आरोपींना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. एकूण 14 आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता त्यापैकी 9 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित पाच आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत.


सिद्धार्थ गांगुर्डे, किशोर पवार, अजित गांगुर्डे, राजू गवळी, सुखमय कांबडे, राजाराम राऊत, चून्नीलाल मालीच, बंडू साबळे, गुलाब गायकवाड या आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


काय आहे प्रकरण?


साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर 1 जुलै 2018 ला मुले पळवणारी टोळी समजून जमावेने पाच जणांची हत्या होती. गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन या सर्वांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पाच जणांचा जीव गेला होता.


हत्या झालेल्यांची नावे


1. भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा)


2. दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा)


3. भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा)


4. अगनू इंगोले - (रा. मानेवाडी, मंगळवेढा)


5. राजू भोसले रा. गोंदवून ( कर्नाटक )


संबंधित बातम्या