लग्नाच्या एक दिवस आधीच नवरदेवावर काळाचा घाला, विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू, आईचा एकुलता एक आधार हरपला
धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या एक दिवस आधीच नवरदेवावर काळाने घाला घातला आहे.
Dhule : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या एक दिवस आधीच नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. स्वतःच्या लग्नाच्या तयारीत असतानाच दुर्दैवाने धुळे जिल्ह्यातील कासारे येथील नवरदेवाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला आहे. 25 फेब्रुवारीला म्हणजे उद्या लग्न होते. गावातील कुटुंबातील कष्टाळू एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानं आईचा आधार गेला आहे. शोकाकुल वातावरणात कासारे येथे अंत्यविधी झाला आहे.
नेमकी कशी घडली घटना?
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कासारे गावातील आदिवासी समाजातील युवक धनु बाजीराव माळचे याचे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी लग्न होते. नवरदेवाच्या लग्नाची तयारी म्हणून घरात वातावरण आनंदीदाई होते. सर्व परिवारतील बहिणी भावाच्या लग्नाची तयारीत असताना धनु माळचे ही घराची साफसफाई करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून खाली पडला. या घटनेनंतर त्याला तात्काळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मोत्र येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केल्याने लग्न घरात स्मशान शांतत पसरली. दुपारी कासारे येथे अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचा अंत्यविधी पार पडला.
अतिशय कष्टाळू व प्रामाणिक तरुणाचा मृत्यू झाल्यानं हळहळ
परिवारातील उमदा सर्व गुणसंपन्न क्रिकेट खेळाबद्दल विशेष आवड असलेला कासाऱ्यातील तरुणांमध्ये मिळून मिसळून राहणारा धनु माळचे सर्वांना सोडून गेला अशा भावना कासारे येथील तरुणांमध्ये व्यक्त करतांना दिसून आले. अतिशय कष्टाळू व प्रामाणिक नवरदेव गेल्यामुळे अंत्यविधी वेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंना बांध फुटला होता. यावेळी कासारे गाव परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
चांदवड येथे कारच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू, तर एक पुरुष गंभीर जखमी
नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चांदवड - निफाड रोडवर एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत पुरुष गंभीर जखमी झाला तर त्याच कारने पुढे पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही महिला आपल्या मुलाला शाळेत घेण्यासाठी जात असतांना हा अपघात घडला.अपघातातील महिलेचे नाव स्वाती कृष्णा कुंभार्डे असे आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























