धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ असलेल्या जामदा गावात कीर्तन सुरु प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प ताजुद्दीन महाराज (Kirtankar Tajuddin Maharaj) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कीर्तन सुरु झाल्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना अवघ्या 45 मिनिटात त्रास जाणवू लागला. यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.


कीर्तनकार ताजुद्दीन महाराज हे जन्माने जरी मुस्लीम असले तरी त्यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती. ह.भ.प. ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन करायचे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वारीला हजेरी लावली आहे. त्यांच्या मृत्यूने धुळे जिल्हा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.