Dhule : धुळे (Dhule) आगारातून विविध मोठ्या शहरात जाण्यासाठी बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागात जाणार्या बसेस अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत याचा फटका ग्रामीण भागातून शहरात शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतोय.
शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे याचा फटका परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणावर बसला असून, सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून धुळे आगाराची राज्यात ओळख आहे. धुळे आगारातून महाराष्ट्र सह अन्य राज्यात देखील बसेस मोठ्या प्रमाणावर जातात. सध्या धुळे आगारातून नाशिक पुणे जळगाव शिर्डी औरंगाबाद आणि भुसावळ येथे जाण्यासाठी एकीकडे बसेस सुरु करण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागात जाणाऱ्या बस मात्र अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत.
चालक आणि वाहकांची या कमतरतेमुळे या बसेस सुरू करण्यास अडचणी येत असल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातून शहरात शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. धुळे शहरात शिंदखेडा दोंडाईचा सोनगीर तसेच तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी दररोज शाळा महाविद्यालयांसाठी येत असतात मात्र बसेस बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना धोकेदायक प्रवास करून शाळेत येण्यासाठी कसरत करावी लागत असून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका धुळे परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणावर बसला असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल अडीच कोटी तर डिसेंबर महिन्यात तीन कोटी 16 लाख तर जानेवारीत सव्वातीन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून बसेस बंद असल्याने बसेस दुरुस्त करण्यासाठी देखील आगाराला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. धुळे आगारात सध्या कंत्राटी पद्धतीने 12 वाहक तर 6 चालकांची नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण भागातील बसेस अद्याप सुरू न करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त होतोय. कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने बसेस सुरळीत पणे कधी सुरू होतील असा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.
संबंधित बातम्या :
Nanded: अवघ्या दोन दिवसांचे प्रशिक्षण अन् यांत्रिकी कर्मचारी बनले चालक तर वाहतूक नियंत्रक बनले वाहक, नांदेडमधील प्रकार
Beed News : ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, 73 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच घडले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha