एक्स्प्लोर

धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रीय, तरुणाची 3 लाख 25 हजारांची फसवणूक, नवरी दागिने घेऊन फरार

धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लग्नाच्या जाळ्यात ओढून तब्बल 3 लाख 25 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरीसह मध्यस्थांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे.

Dhule Crime News :  लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणांना हेरुन त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवू लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. अशीच एक मोठी टोळी खान्देशात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लग्नाच्या जाळ्यात ओढून तब्बल 3 लाख 25 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरीसह मध्यस्थांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फागणे येथील रहिवासी जितेंद्र रमेश पाटील हे सेंट्रींग कामगार म्हणून काम करतात. लग्नाचे वय झाल्याने त्यांचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. यादरम्यान त्यांची ओळख शहादा येथील ज्योती चुनिलाल निकम हिच्याशी झाली. ज्योतीने लग्नाचे आमिष दाखवून जितेंद्रकडून वेळोवेळी फोन पे द्वारे 78 हजार रुपये उकळले. 19 फेब्रुवारी रोजी ज्योती निकम ही इतर साथीदारांसह एका खाजगी गाडीने (GJ 15 AD 9974) फागणे येथे मुलगी दाखवण्यासाठी आली. लग्नाच्या बदल्यात 2 लाख 20 हजार रुपये आणि प्रवासाचा खर्च 20 हजार, अशी एकूण 2 लाख 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. जितेंद्र यांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन ही रक्कम आरोपींच्या स्वाधीन केली.

19 तारखेला लग्न 20 तारखेला पैसे आणि सोने घेऊन पलायन

19 तारखेला 'खोटे' लग्न लावून दिल्यानंतर सर्वजण जेवण करुन निघून गेले. मात्र, 20 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास, नवरी म्हणून आलेली सरिता पवार आणि तिची सोबती रिना वळवी यांनी बाथरुमला जाण्याचे निमित्त केले. त्यांनी बाहेरुन दरवाजाची कडी लावून घरून पलायन केले. जाताना त्यांनी घरातील 85 हजार रुपये रोख आणि 6 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर पीडित तरुणाने मध्यस्थ ज्योती निकम हिच्याशी संपर्क साधला असता, तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जितेंद्र पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात ज्योती निकम, चुनिलाल निकम, सागर गवळी, सरिता पवार, रिना वळवी, अर्चना पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

सदर टोळी ही सराईत असून त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय व्यक्त होत आहे. माझ्याकडे या सर्व व्यवहाराचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो पुरावे म्हणून उपलब्ध आहेत, असे फिर्यादी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. धुळे तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एजंटांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Embed widget