Dharashiv Accident News : धाराशिव जिल्ह्यातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात (Accident on Dhule-Solapur National Highway)झाल्याची घटना घडली आहे. टॅम्पोच्या पुढे आलेल्या कारला वाचवताना 35 मूकबधिर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे. या अपघातात तीन मूकबधिर मुले गंभीर तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  दरम्यान, या अपघातचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. 

Continues below advertisement

अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर टॅम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 मूकबधिर मुले गंभीर तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  बाकी 31 विद्यार्थ्यावरही शासकीय रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. उमरगा येथील मूकबधिर निवासी शाळेतील मुलं धाराशिवकडे जात असताना हा अपघात झाला आहे. हॉटेल भाग्यश्री समोरच हा अपघात  झाला आहे. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात, माय लेकीचा जागीच मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 56 वर नांदुरा-खामगाव दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, 

Continues below advertisement

आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली घटना

आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव -नांदुरा दरम्यान आमसरी फाट्या नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार झाल्या आहेत. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीचा अक्षरशः रस्त्यावर चुराडा झाला होता. तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्यावर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

महत्वाच्या बातम्या:

Accident News: कारचा स्पीड 140, नियंत्रण सुटलं अन् ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा चेंदामेंदा; दोन जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी अंत