Dharashiv : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालं आहे. धाराशिव (Dharashiva) जिल्ह्याला देखील पुराचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पावसानं हैराण झालेल्या तसेच घरातील साहित्य भिजले, सांभाळायला कोणी नाही म्हणून एका वृद्ध महिलेनं नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसवर चालक असलेल्या तरुणाने नदीत उडी घेत महिलेचा जीव वाचवला आहे. अमोल भातलवंडे असं धाडसी तरुणाचं नाव आहे. दरम्यान, वृद्ध महिलेचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.  

Continues below advertisement


महिलेचा जीव वाचवतानाचा थरारक व्हिडिओ समोर 


धाराशिवच्या सापनाईमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहिफळ येथील तेरणा नदीच्या पुलावरुन या महिलेनं उडी मारली आहे. स्कूल बसवर चालक असलेल्या तरुणाने नदीत उडी घेत महिलेचा जीव वाचवला आहे. अमोल भातलवंडे असं धाडसी तरुणाचं नाव आहे. तरुणाने महिलेचा जीव वाचवतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. भागुबाई वाघमारे असे महिलेच नाव आहे. सापनाई येथील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं  आहे. भागुबाई सापनाई यांना मुले, पती कोणीही नाही. गावकऱ्यांनी निवारा करून दिलेला आहे. मात्र पावसाचं पाणी या निवाऱ्यात जाऊन सर्व साहित्य भिजून गेलं आहे. त्यामुळं नैराश्यात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे.


पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं


मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत (Marathwada Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी शेती पिकं आडवी झाली आहेत. काही पिकं वाहून गेली आहेत. जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशीमागणी केली जात आहे. अतिवृष्टीचा आणि पुराचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. या संकटातून आता कसे बाहेर पडायचे असा सवाल अनेक शेतकऱ्यांना केला आहे. सरकरानं कोणतेही निकष न लावता पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यातील शेतकरी करताना दिसत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 6 जणांचा मृत्यू, 213 जनावरांचा बळी, शेकडो घरांचे नुकसान, आतापर्यंतची आकडेवारी समोर