Dharashiv ZP election result 2026 : धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजपला मोठं यश, राष्ट्रवादीसह ठाकरेंना धक्का, कोणत्या पक्षाला किती जागा?
Dharashiv District Council Election Results : धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे.

Dharashiv ZP Election Results 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष 4 निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाला एकही जागा मिळाली नाही.
मतदान प्रक्रिया शनिवारी (7 फेब्रुवारीला) पूर्ण झाली होती. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले होते. दरम्यान, यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होते. कारण दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे कल हाती येत आहेत.
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली आहे. आलूर पंचायत समिती गणातून 3925 मतांनी आकांक्षा चौगुले यांचा विजय. आकांक्षा चौगुले उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या दावेदार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आकांक्षा चौगुले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.
धाराशिव जिल्हा परिषद पक्षनिहाय आघाडी
एकूण जागा - 55
भाजपा -18
शिवसेना शिंदे गट - 15
शिवसेना ठाकरे गट - 8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 6
अपक्ष - 4
काँग्रेस - 3
समाजवादी पक्ष - 1
धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाा लागली होती. भाजप आणदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता. जवळा गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत होत्या.
सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Winner Candidate List 2026)
























