एक्स्प्लोर

ओमराजेंनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष दिलं, भावजयीला निवडून आणण्याचा प्लॅन सस्केस, सक्षणा सलगर यांचे गंभीर आरोप

तेर जिल्हा परिषद गटातून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Dharashiv Zilla Parishad election results 2026 :  राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेर जिल्हा परिषद गटातल लढतीकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. कारण या गटातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर या निवडणूक लढवत होत्या. यामध्ये अर्चना पाटील या विजयी झाल्या आहेत. पराभव झाल्यानंतर सक्षणा सलगर यांनी  ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष दिल्याचे सलगर म्हणाल्या. 

सक्षणा सलगर यांचा ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप

तेर जिल्हा परिषद गटातून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडणूक आणण्याचा प्लॅन सक्सेस केला असे सक्षणा सलगर म्हणाल्या. ओमराजे यांनी अर्चना पाटील यांना निवडूण आणण्यासाठी प्लॅनिंग केली होती. निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे सलगर म्हणाल्या. सक्षणा सलगर यांनी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांचे आभार मानत टिका केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी करोडो रुपायचं वाटप केले होते असे सलगर म्हणाल्या. तेर गटातुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील 2328 मतांनी विजयी झाल्या आहेत. 

खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष दिलं

खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष देत त्यांच्या भावजयी अर्चना पाटील यांना निवडून आणलं. तेर मधील पराभूत उमेदवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत. तर करोडो रुपयांच वाटप अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं रात्रीचे सीसीटीव्ही तपासा असे सक्षणा सलगर म्हणाल्या. सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटील यांच्या विरोधात तेरमधून निवडणूक लढवली होती.

माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत विजयी

माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी झाले आहेत.  परंडा तालुक्यातील जवळा गटातून बंडखोरी करत अपक्ष  निवडणूक लढवली होती. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी झाले आहेत.  धनंजय सावंत यांनी बंड करून लढवल्या भूम परंडा वाशी मतदार संघात जागा लढवल्या होत्या. भूम परंडा वाशी हा आमदार तानाजी सावंत यांचा मतदारसंघ आहे. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये धनंजय सावंत यांची लढत होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
Womens Day 2026 Success Story : इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती
इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती, 98 टक्के घरीच पिकतो भाजीपाला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Embed widget