Dharashiv Zilla Parishad election result 2026 : भूम वाशी परांडा मतदारसंघात तानाजी सावंतांचा दबदबा कायम, शिवसेनेचा किती जागांवर विजय?
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.
Dharashiv Zilla Parishad election result 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 12 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 10 जागा मिळाल्या आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा चांगला दबदबा राहिला आहे. त्यांनी सर्वच्या सर्व 13 जागा लढवल्या होत्या. यामध्ये त्यांना 8 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळं परांडा तालुक्यात तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद जागावर तानाजी सावंत यांचा दबदबा
परंडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद जागावर तानाजी सावंत यांचा दबदबा राहिला आहे. भूम, परांडा , वाशी तालुक्यात जाहीर झालेल्या निकालातून आतापर्यंत शिवसेनेचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने सर्वच्या सर्व 13 जागा लढवल्या होत्या.
आतापर्यंत आलेले निकालात शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 12 जागा मिळाल्या
धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 12 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 10 जागा मिळाल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाला 5 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष 3 निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाला एकही जागा मिळाली नाही.
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026) मतमोजणी सुरु झाली आहे.12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 564 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- 198, शिवसेना शिंदे गट- 124, राष्ट्रवादी अजित पवार गट- 115, काँग्रेस- 44, शिवसेना ठाकरे गट- 36, राष्ट्रवादी शरद पवार गट- 13, इतर- 34 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
























