Dharashiv News : लातूर (Latur) येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये स्थानिक असल्यामुळं नोकरीत डावलले जात आहे. इतर राज्यातील वरिष्ठ अधिकारी जाणून-बुजून डावलत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यासंदर्भात मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर तरुणांनी व्यथा मांडली. स्थानिकांना रोजगार दिला असं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना संधी नसल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. दरम्यान, तरुणांच्या नोकरीबाबत लक्ष घालण्याचा शब्द ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी उद्धव ठाकरेंसमोर दिला आहे.
स्थानिक असल्यामुळं आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप
धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेला उद्धव ठाकरेंना रोजगाराच्या प्रश्नावर तरुणांनी भेट घेतली. लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आहे. यामध्ये स्थानिक असल्यामुळं आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप अनेक तरुणांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारी हे इतर राज्यातील आहेत ते त्यांच्याच राज्यातील तरुणांना संधी देत असल्याचाही आरोपही त्यांनी केलाय. स्थानिकांना रोजगार देणार असं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचं तरुणांचे मत होते. धाराशिव इथं उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांच्यासमोर तरुणांनी त्यांचा प्रश्न मांडला. यावेळी धाराशीचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नोकरीच्या प्रश्नात आपण जातीने लक्ष घालणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरेंसमोर तरुणांना दिला. लातूर रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या न मिळण्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळं या भागातील स्थानिक तरुण आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत, ठाकरेंची टीका
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौऱ्यातील आज दुसरा दिवस आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत. मला म्हणतात आता उद्धव ठाकरे घराबाहेर निघाले. अरे बाबा तुम्ही आधी आपलं घर बघा. शेतकरी संकटात आहे. दुनियादारी करत फिरताय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये सातबारा कोरा करु, असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहे. यावर हे दुतोंडी सरकार आहे. राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले, अशी टीका करत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मिळालेच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
महत्वाच्या बातम्या: