Dharashiv News: खोकला, सर्दीसाठी औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा (Cough Syrup) धाराशिवमध्ये (Dharashiv News) चक्क नशेसाठी वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातून गेल्या चार महिन्यात जवळपास सात हजार कप सिरपच्या बाटल्या खरेदी करण्यात आल्याचीमाहितीआहे. तर खाजगी मेडिकलमधून कफ सिरप खरेदी करण्याचे प्रमाण हे वेगळंच आहे. त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचीमाहिती आहे. कफ सिरपच्या अति सेवनाने नशा येते आणि वासही येत नाही, त्यामुळे त्याचा वापर वाढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कफ सिरपची मागणी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तुम्हाला खोकला नाही, गोळ्यांवर बरे होईल. असं सांगितलं तरी औषधासाठी दबाव आणला जात असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कफ सिरफच्या अती वापरामुळे धोका निर्माण होऊ शकतो. कोणीही त्याचा अतिरिक्त वापर करू नये, अस आवाहन कळंब उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम पाटील आणि डॉक्टरांकडून करण्यात आल आहे.
Cough Syrup Bottle : नशेसाठी कफ सिरपचा वापर का?
कफ सिरप केमिस्टकडे सहज मिळते. अनेक केमिस्ट प्रीस्क्रिप्शन देखील विचारत नाहीत. शिवाय ओळखीच्या केमिस्टकडून तर अजिबात विचारणा होत नाही. खोट्या प्रीस्क्रिप्शनची शहानिशा केली जात नाही. पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता कमीचआहे. सर्दी, खोकल्याचे कारण दिल्याने घरच्यांनाही संशय येत नाही. दारू किंवा ड्रग्जप्रमाणे दुर्गंधी येत नाही.
मालेगावातील आझादनगर पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर अल्प्राझोलॅम अर्थात 'कुत्ता' गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 3 हजार अल्प्राझोलॅम गोळ्या, दुचाकी व मोबाईलसह 34 हजार 352 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद आयाज निसार अहमद अन्सारी (रा. मालेगाव) व मोहम्मद इसाक अन्सारी उर्फ जावेद बकरी (रा. भिवंडी) यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
