Dharashiv : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचालीला सुरुवात केली आहे. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि माजी आमदार राहुल मोटे ( Rahul Mote) यांचे गट आमने-सामने आले आहेत. परंडा नगरपरिषदेत राजकीय वादातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचे गट आमने सामने
परांडा तालुक्यात शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचे गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत. निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याने गोंधळ झाल्याची माहिती मिळाली आहे. यातून तानाजी सावंत आणि राहुल मोटे गटाचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. तानाजी सावंत गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात वादावादी झाली आहे. तसेच राजकीय वादातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना देखील घडली आहे.
राज्यात एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान
राज्यात एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होतील.या निवडणुकीत एकूण 3,820 प्रभागांमध्ये 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. तर मतदानकेंद्र निहाय मतदार यादी 7 नोव्हेंबर 2025 ला जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या निवडणुकीच्या तोंडावर दुबार आणि तिबार मतदारांचा विषय अत्यंत ऐरणीवर आलेला पाहायला मिळाला आहे. त्याबाबत निवडणूक आयोग दक्षता घेत असल्याचंही यावेळी वाघमारे यांनी सांगितलं. दुबार आणि तिबार मतदाराची तपासणी केली जाणार असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे अवैध मतदान होणार नसल्याची काळजी घेतली जाईल, असंही यावेळी वाघमारे यांनी सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या: