Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरमध्ये दोन गटात जोरदार भांडण आणि हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे निवडणूक लढवलेले उमेदवार पिटु गंगने व महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात  वाद झाला आहे. गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरुन हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. 

Continues below advertisement

दोन्ही गटाच्या वादामुळे रस्त्यावरील ट्राफिक दोन तासापासून जाम

तुळजापुरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही गटाच्या वादामुळे रस्त्यावरील ट्राफिक दोन तासापासून जाम आहे. रस्त्यावर प्रचंड नागरिकांची व बघ्यांची गर्दी आहे. धाराशिवसोलापूर कडे जाणारा रस्ता ब्लॉक झाला आहे. निकालापूर्वीच दोन्ही गटात भांडण झाल्याने तुळजापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार भांडण होऊन देखील दोन्ही गटाकडून पोलिसात कुठलीच तक्रार देण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती घेत आहेत. त्याचबरोबर ब्लॉक झालेला धाराशिव - सोलापूर रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या घटनेनंतर तुळजापूर शहरामध्ये तणावाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर शहरातील अनेक व्यवसायिकांनी दुकाने बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. 

भडगाव शहरात दोन बालकांचा शाळेच्या शेजारील नाल्यात पडून मृत्यू, घटनेस जबाबदार व्यक्तिंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगावमध्ये भडगाव शहरात दोन बालकांचा शाळेच्या शेजारील नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांचा चाळीसगाव भडगाव महा मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले जात आहे. जळगाव भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेच्या नर्सरीच्या दोन विद्यार्थ्यांचा आज शाळेच्या शेजारी असलेल्या नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटने नंतर संपूर्ण भडगाव तालुक्यात संतापाची लाट असून,घटनेत दोषी असणाऱ्या वर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मयत बालकाच्या नातेवाईकांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात जमाव रास्तारोको साठी उतरल्याने,दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली असून,कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Crime: शेतातातील विहिरीच्या पाण्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावानं लहान भावाला निर्घृणपणे संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून जाळला, पण...