धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ऐन निवडणूक काळात गाडीत काठ्या आणि कुराडी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप
राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. चार जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी निवृत्ती अंचेवाढ असं गंभीर जखमी असलेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मारहाणीत भाजप कार्यकर्त्याचा हात आणि पाय फॅक्चर झाला आहे. जखमीवर बार्शी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्या आहेत. उद्या यासाठी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळं राज्यातील अनेक ठिकाणचे राजकीय वातावरण चांगलचे तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यामुळं काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. राजकीय वादातून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांंनी केला आहे.
मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदी दरम्यान अपघात; वाहतूक पोलिसाला दुखापत, आरोपी अटकेत
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे बेदरकार वाहन चालवणे व लोकसेवकावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एन.एस. रोडवरील इंटरकॉंटिनेंटल हॉटेलसमोर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान, एमएच ०६ बीए १००० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार चालक हरीश फैजल खान (वय २८) याने बॅरिकेडला जोरदार धडक दिली. या घटनेत बॅरिकेडच्या पलीकडे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाघ हे खाली पडले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ही घटना सुमारे पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या:
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
























