Dharashiv Crime News : धाराशिवमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. 13 महिन्यांच्या चिमुकलीचे चुलत्यानेच कोयत्याने तुकडेकेले आहेत. धाराशिवच्या गवळेवाडी इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची वडिलांनी तक्रार दिली होती. पोलीस तपासात चुलत्यानेच पळवून नेल्याचे समोर आले आहे.
मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरुन रागाच्या भरात केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, चुलता शंकरेश्वर माने याने कोयत्याने चिमुकलीचे तुकडे केले आणि त्यानंतर पोत्यात भरुन जमिनीत पुरले होते. याप्रकरणी आरोपीकडून कबुली जबाब दिला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तामलवाडी पोलिसांनी 24 तासात संशयित आरोपीला ताब्यात घेत, मृतदेहाचा शोध घेतला. भावाची पत्नी पर पुरुषासोबत पळून गेली होती, मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरुन रागाच्या भरात चुलत्याने मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जळगावात प्रेयसीची बंदुकीने गोळ्या घालून हत्या, प्रियकरानंही स्वत:ला संपवलं
जळगाव जिल्ह्यात देखील धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकारणात प्रेयसीची बंदुकीने गोळ्या घालून हत्या केल्याच्या नंतर प्रियकराने देखील स्वतःला गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात अकुलखेडा गावात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात अकुलखेडा गावात जगदीश पाटील हे आपल्या पत्नी अनिता सह राहतात,आज सकाळी अकरा वाजता त्यांची मुलगी शाळेतून घरी आली असता, घराचा दरवाजा बंद असल्याचं तिला दिसून आले,यावेळी मुलीने दरवाजा उघडताच तिला आपली आई आणि अन्य एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले,मुलीने वडिलाना फोन करून घरी बोलावले असता,घडल्या गंभीर प्रकार पाहून त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली
जागेच्या वादातून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांकडून मारहाण, पोलीसात तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या केज तालुक्यातील लव्हुरी गावातील खांडेकर कुटुंबावर जागेच्या वादातून 10 ते 12 जणांनी हल्ला केला. छोट्या मुलीसह महिलेला आणि वृध्द व्यक्तीला अमानुष मारहाण केली. काल मारहाण प्रकरणी केज पोलीसात चार व्यक्तींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर आज सकाळी पुन्हा 10 ते 12 जणांनी कुटुंबाला अमानुष मारहाण केली आहे. जखमी कुटुंबावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या: