Dhananjay Munde : चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतो, हिरो मात्र लक्षात राहत नाही, हे बदलायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. बीडच्या परळी येथील धर्मापुरी मध्ये एका विद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे ते बोलत होते. धुरंधर मधील हिरो कोण असे विचारताच विद्यार्थ्यांनी सांगितले अक्षय खन्ना. यावेळी भाषण करताना आमदार धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना हात जोडले. 

Continues below advertisement

आम्ही राजकारणात संघर्ष करतोय

बीडच्या परळी येथील धर्मापुरीमध्ये एका विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. भाषणात आमदार धनंजय मुंडे यांनी एखादा हिंदी पिक्चर तुम्हाला आठवतो का? असे विद्यार्थ्यांना विचारले यावर विद्यार्थ्यांनी धुरंधर असे नाव सांगितले. या चित्रपटातील नायक कोण असा सवाल धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना केला असता विद्यार्थ्यांनी अक्षय खन्ना याचे नाव घेतले. यावर धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना हात जोडत.खंत व्यक्त केली. आज हेच होत आहे, एखाद्या चित्रपटातील विलन लक्षात राहतो परंतु हिरो लक्षात राहत नाही. हे बदलायला हवं अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अशा कठीण काळात आम्ही राजकारणात संघर्ष करतोय असे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला गेले होते. त्यामुळं धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे पुन्ह मंत्री होणार असी देखील चर्चा सुरु आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली. अखेर त्यांचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांनी स्वीकारला होता. सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात येत होती. विरोधकांनीही यावर रान उठवले होते. अखेर त्यानी राजीनामा दिला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची जागा कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पुन्हा धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?