Dhananjay Munde met Amit shah : सदनिका घोटाळाप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने काल माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचं बोललं जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून केली जात आहे. अशातच माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 

Continues below advertisement

धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा

दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळं मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. जवळपास एक तास धनंजय मुंडे हे संसद भवनात होते. 11 वाजता ते संसद भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे. अद्याप, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील अद्याप काही माहिती दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत आहेत. त्यामुळं धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे  (Manikrao Kokate Arrest Warrant) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर कोकाटेंकडून हायकोर्टात याबाबत स्थगिती मिळवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच कोकाटेंच्या आमदारकीवरतीही आता गदा येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा, मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ?