एक्स्प्लोर

Dhananjay Munde : छगन भुजबळांना मंत्रिपद,  धनंजय मुंडे नाराज? मुंडे तातडीने अजितदादा-फडणवीसांच्या भेटीला

Maharashtra Politics : छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतर पुढच्या काळात धनंजय मुंडेंचे भविष्य काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

मुंबई : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळांनी वर्णी लागली. त्यानंतर आता धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (20 मे) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि इतरांवर आरोप झाले. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्यावरही आरोप झाले. त्या प्रकरणी दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

दुसरीकडे, मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ सुरुवातीपासूनच नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त करत अजित पवारांवरही टीका केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती. 

नंतरच्या काळात राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे  रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागली. 

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे नाराज? 

एकीकडे ओबीसी नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कारण भुजबळांना मंत्री केल्यानंतर पुढच्या काळात धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचमुळे धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काही वेळ चर्चा झाल्यानंतर हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले. 

भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आठ दिवसांपूर्वीच चर्चा

दरम्यान, भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी एबीपी माझाच्या हाती लागल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्यानंतर छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. या बैठकांमध्ये भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाहांसोबत बोलणं झाल्यानंतरच मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Barshi news: बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
INDW vs PAKW: पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
Pandhapur Kartiki Ekadashi 2025: राज्यात 2 उपमुख्यमंत्री, कार्तिकीची पूजा कोण करणार?; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न, मागची काही वर्ष कोणी पुजा केली?
राज्यात 2 उपमुख्यमंत्री, कार्तिकीची पूजा कोण करणार?; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न, मागची काही वर्ष कोणी पुजा केली?
BMC Election Wards: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी, निवडणुकीच्या हालचालींना वेग
BMC Election Wards: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी, निवडणुकीच्या हालचालींना वेग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Barshi news: बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
INDW vs PAKW: पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
Pandhapur Kartiki Ekadashi 2025: राज्यात 2 उपमुख्यमंत्री, कार्तिकीची पूजा कोण करणार?; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न, मागची काही वर्ष कोणी पुजा केली?
राज्यात 2 उपमुख्यमंत्री, कार्तिकीची पूजा कोण करणार?; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न, मागची काही वर्ष कोणी पुजा केली?
BMC Election Wards: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी, निवडणुकीच्या हालचालींना वेग
BMC Election Wards: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी, निवडणुकीच्या हालचालींना वेग
Cough Syrup News : मेडिकल स्टोअर्समध्ये 'ते' विषारी औषध दिसले तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून महत्त्वाचे आवाहन
मेडिकल स्टोअर्समध्ये 'ते' विषारी औषध दिसले तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून महत्त्वाचे आवाहन
Bhiwandi Fire Accident : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात भीषण आग; केमिकल व कुरिअर गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात भीषण आग; केमिकल व कुरिअर गोदाम जळून खाक
चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
Abhishek Sharma : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, तिलक वर्मा अपयशी, पंजाब किंग्जच्या खेळाडूचं दमदार शतक, आस्ट्रेलियाची धुलाई 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, तिलक वर्मा अपयशी, पंजाब किंग्जच्या खेळाडूचं दमदार शतक, आस्ट्रेलियाची धुलाई 
Embed widget