Dhananjay Munde on State Govt : हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नाही, तर स्वतःच्या हितासाठी आलं  आहे, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सरकारवर निशाणा लगावला. परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. अद्यापही अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तसेच काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याचे मुंडे म्हणाले. 


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही


मागील वर्षीही परतीच्या पावसामुळं अशीच परिस्थिती झाली होती. आम्ही मदत केली, पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. राज्यात पिकांचं एवढं नुकसान झालं आहे, मात्र कुठलेच मंत्री दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. शिधा भेटणार नाहीच नुसत्या गोड घोषणा सरकार करत असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. एकतर मंत्रीमंडळाचा विस्तार उशीरा केला. पालकमंत्रीपदाची घोषणा उशीरा केली. त्यामुळं सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी याबाबत कोणताही दिलासा द्यायला तयार नसल्याचे मुंडे म्हणाले. अनेक ठिकाणी 65 मिमी पुढे पाऊस पडला आहे. तरी देखील तिथे पंचनामे झाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. मी याबाबत तीन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात पत्र दिले असल्याचे मुंडे म्हणाले.


अतिवृष्टीनं सोयाबीनसह कापूस आणि फळबागांनांही फटका


बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळं मोसंबीच्या फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची भयंकर स्थिती झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली होती, ते सोयाबीन जागेवरच असून पावसामुळं त्याला कोंब फुटले असल्याचे मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना अशीच स्थिती आली होती. या स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यांना अनुदान दिले होते. बीड जिल्ह्यात 800 कोटी रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले होते असेही मुंडे म्हणाले. 


संकटाच्या काळात मंत्री कुठेच दिसत नाहीत


कृषीमंत्री नाहीतर सगळेच मंत्री कुठे दिसत नाही. संकटाच्या काळात मंत्री कुठेही दिसत नसल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत, पण सरकारनं मदत करायचीच नाही असं ठरवल्याचे मुंडे म्हणाले. हे सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलं नसून स्वत: च्या हितासाठी सत्तेत आलं असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, पहा कोणत्या भागात काय परिस्थिती