Devendra Fadnavis: गडचिरोलीत माओवाद्यांच्या म्होरक्या प्रभाकरला कंठस्थान हे मोठं यश; मुख्यमंत्री फडणवीसांकडून सी-60 दलाचं अभिनंदन म्हणाले...
Devendra Fadnavis on Gadchiroli Police : सी-60 जवानांच्या विरतेमुळे अतिशय उत्तम कार्य झालं, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis नागपूर : गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroli Police) C-60 जवानांच आणि पोलिसांच अभिनंदन करतो. अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेय. नक्षलवाद्यांच्या (Maoists) तुकडीची एकच कंपनी गडचिरोलीत शिल्लक होती. त्यातील प्रमुख 7 लोकांना कंठस्थान घालण्यात यश आलं आहे. अतिशय कठीण परिस्थितीत हे ऑपरेशन राबवण्यात (Gadchiroli News) आलं. तीन दिवस आमचे पोलीस हे ऑपरेशन राबत होते. हा तो भाग आहे ज्या भागात आपण फारसे ऑपरेशन कधी केलेले नाही. अतिशय डेन्स असा हा भाग होता. त्यात दोन घेरे पोलिसांनी घातले आणि प्रचंड गोळीबार यावेळी दोन्ही बाजूने झाला. या मोहिमेत जवळपास 7 नक्षल्यांचा खात्मा झालाय. त्यात त्यांचा जो म्होरक्या प्रभाकर होता, तो देखील मारला गेलाय. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
त्यामुळे आता अगदी बोटावर मोजण्याइतके बडे नक्षली शिल्लक राहिले आहेत. आपल्या राज्याचा बाजूने अतिशय कमी प्रमान नक्षल्यांचे उरले आहे. यात दुर्दैववाने आपला एक पोलीस जवान शाहिद झाला आहे, त्यांना मी अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही काळजी घेऊ. सी-60 जवानांच्या विरतेमुळे अतिशय उत्तम कार्य झालं, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. गडचिरोलीतील पोलिसांनी राबवल्या नक्षलविरोधी मोहिमेच्या कारवाई संदर्भात ते नागपूर येथ बोलत होते.
Devendra Fadnavis : सोलर मॉडेलमध्ये 10 हजार कोटीचा एमओयू; विदर्भासाठी मोठा फायदा
आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 22 देशातील लोक अडवांटेज विदर्भासाठी आले. या 22 देशातील आंबेसिडर, हाय कमिशनर काँसिल जनरल आले आहेत. त्यांच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगाच्या संधी सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. काही MOU केलेले आहे. केअर हॉस्पिटलचा 500 बेडेडचा एमओयु आज केलेला आहे. ते नागपुरात तयार होत आहे. सोलर मॉडेलमध्ये 10 हजार कोटीचा एमओयु केलेला आहे. त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. रोजगारही उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले MOU केलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाला चांगल्या पद्धतीने मजबूत करण्याचे काम करत आहे.
Devendra Fadnavis : बुलेटप्रूफ जॅकेट असताना पोलीस कर्मचारी शहीद त्यांना आदरांजली
महाराष्ट्राच्या बाजूला बोटावर मोजणारे तीन ते चार मोठे नक्षलवादी राहिलेले आहे. वेगाने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांचं काम अत्यंत उत्तम आहे. दुर्दैवाने एका पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. बुलेटप्रूफ जॅकेट असताना त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीक पद्धती गोळी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, त्यांना आदरांजली अर्पण करतो. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Gadchiroli News : 7 जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड जंगलात गेले तीन दिवसांपासून पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरु आहे. यामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी प्रभाकर, रा. कामारेड्डी, तेलंगणा याच्यासह एकूण 7 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मारला गेलेल्या माओवादी प्रभाकर याच्यावर एकूण 25 लाखांचे बक्षीस जाहीर होते.
इतर महत्वाच्या बातम्या

























