Devendra Fadnavis : श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणांच्या सेवा सुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली होती. याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज त्याला यश आल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

Continues below advertisement

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना आज प्रसिद्ध केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो असे फडणवीस म्हणाले. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होत असल्याचे फडणवीस म्हणाले. या निर्णयानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. भगवानगड ट्रस्टला जमिन देण्याच्या निर्णयाचे पंकजा मुंडेंकडून स्वागत करण्यात आले आहे. ट्वीटरवर पोस्टद्वारे मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेl. 

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

Thank you so much @Dev_Fadnavis जी ..तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते. तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील. तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील. कोटी कोटी धन्यवाद असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Dhananjay Deshmukh : नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर