Nitin Gadkari : यापुढं महाराष्ट्रात गडचिरोली (Gadchiroli) हा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा असेल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. साडेतीन लाख कोटींची खासगी गुंतवणूक गडचिरोलीत होणार असल्याचे गडकरी म्हणाले. शेतकरी आत्महत्या, मेळघाट कुपोषण, आदिवासी भाग अशी विदर्भाचा एकेकाळी ओळख होती. पण आता हा भाग औद्योगिक विकासाचा क्षेत्र बनत असल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भात सगळ्याच क्षेत्रात विकास झाला पाहिजे याची योजना आम्ही तयार केली असल्याचे गडकरी म्हणाले.  


विदर्भात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती 


गडचिरोली जिल्ह्यात मी जेव्हा मंत्री असताना फिरत होतो तेव्हा पोलिसांची तीन लियर सुरक्षा राहत होती. पण आता गडचिरोलीची स्थिती बदलली आहे. तिथे उद्योग नागरी होत आहे. एअरपोर्ट होत आहे. इथं खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा आयर्न गडचिरोलीत आहे. इथे मोठी इन्व्हेस्टमेंट होत असल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातील मिहानमध्ये आय टी सेक्टरची सुरुवात झाली तेव्हा काही लोकांनी त्याचा विरोध केला होता. पण आता त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होत आहे असं गडकरी म्हणाले. एमआरओ साठी आता विदेशात जाण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.


दुधाच्या क्षेत्रात विदर्भ संपन्न होईल


इंटरनॅशनल एअर पोर्टचं काम सुरु झालं आहे. येणाऱ्या काळात 3 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असेही गडकरी म्हणाले. दुधाच्या क्षेत्रात विदर्भ संपन्न होईल. आम्ही फक्त नागपूरबद्दल विचार करत नाही तर ज्या भागात जे आहे त्याला पुढे आणत आहोत असेही गडकरी म्हणाले. नागपुरातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात निर्यात होऊ शकते असंही ते म्हणाले.  


विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी तयार होणार


विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी तयार केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागा द्यावी अशी विनंती करतो असे गडकरी म्हणाले.  इथे इंपोर्ट सबसिटीत्युड आम्ही तयार करणार आहोत. स्पेनमध्ये संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना घेऊन जाऊन त्यांना तिथल्या मोठ्या उत्पादन देणाऱ्या शीड संदर्भात माहिती दिली जाईल असंही गडकरी म्हणाले.  विदर्भातील सगळ्याच क्षेत्रात विकास झाला पाहिजे याची योजना आम्ही तयार केली असल्याचे गडकरी म्हणाले. प्रत्येक तालुक्यात ड्रायव्हिंग सेंटर खोलवर असल्याची घोषणा गडकरी यांनी केली आहे. सगळ्या आजी माजी खासदार खासदारांनी विदर्भाच्या विकासासाठी यात सहभागी व्हावं असेही गडकरी म्हणाले.