Solapur Shivsena News : राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज सोलापूर (solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आज अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ( Siddharam Mhetre) यांचा शिवसेनेच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. तसेच शिवसेनेचा मेळावा देखील होणार आहे. यानिमित्तानं एकनाथ शिंदे व शिवसेनेचे अनेक नेते येणार अक्कलकोटमध्ये येणार आहेत. मात्र, अशातच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला तोंड फुटलं आहे. कारण, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांना डावलून कार्यक्रमाचे नियोजन सुरु झाल्याने सावंत गट आक्रमक झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार
राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आज सोलापूर जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. अशातच शिवसेनेतील गटबाजीला तोंड फुटले आहे. कारण, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांना डावलून कार्यक्रमाचे नियोजन सुरू झाल्याने सावंत गट आक्रमक झाला आहे. या सभेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची भूमिका माढ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मुन्ना साठे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
सत्ता आल्यानंतर अलीकडच्या काळात आलेले पदाधिकारी जिल्ह्यातील मूळ शिवसेना संपवू पहात असल्याचा आरोप सावंत गटाने केला आहे. सत्तेसाठी कोणाच्यातरी सांगण्यावरुन ही मंडळी पक्षाला अडचणीत आणत असल्याची तक्रार सावंत गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. प्राध्यापक शिवाजी सावंत हे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख असूनही त्यांना डावण्याचे काम महेश साठे व नवीन आलेली मंडळी करीत असल्याचा आक्षेप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करणारे सिद्धाराम म्हेत्रे कोण?
सिद्धाराम म्हेत्रे हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री होते.
4 वेळा सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसच्या तिकिटावर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
अक्कलकोट येथे म्हेत्रे घराण्याची मोठी ताकद आहे. वडिलांपासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आगमननंतर 2019 पासून सिद्धाराम म्हेत्रे यांची पीछेहाट झाली आहे.
सलग दोन वेळा पराभव आणि साखर कारखाना, सहकारी संस्था अडचणीत होत्या.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचे सर्वच्या सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज, शिवसेनेच्या आढावा बैठकीत फक्त आणि फक्त दादांचीच चर्चा!