Abdul Sattar : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करुन जर त्यातून वाईन (Wine) तयार होत असेल. त्या वाईनला चांगलं मार्केट (Market) मिळून शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर तो चांगला निर्णय असल्याचे मत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Satta) यांनी व्यक्त केलं. सुपरमॉल्समध्ये वाईन विकण्याच्या प्रस्तावाबाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shabhuraj desai) यांना माझं अनुमोदन असल्याचेही सत्तार म्हणाले. शंभूराज देसाई यांनी जर असा प्रस्ताव आणला तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मला कृषीमंत्री म्हणून वाटत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.


दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना भाजपने या निर्णयला विरोध केला होता. याबाबत देखील सत्तार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले की, याबाबचा विभाग शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. ते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील. शेवटी भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. पण शंभूराज देसाई यांची भाजपच्या नेत्यांसोबत याबाबत काही औपचारीक चर्चा झाली असेल असं मला वाटत असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले. चर्चा जर झाली नसेल तर भाजपच्या नेत्यांसोबच शंभूराज देसाई चर्चा करतील. त्यांना याबाबात समजून सांगतील. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतमालावर प्रक्रिया करुन वाईन तयार होणार असल्याचे सत्तार म्हणाले.


शंभूराज देसाई भाजपच्या नेत्यांना विनंती करतील 


याबाबत काही जणांकडून गैरसमज पसरवण्याचे काम केलं जात आहे. या निर्णयाबाबत शंभूराज देसाई भाजपच्या नेत्यांना विनंती करतील. भाजपच्या नेत्यांना या निर्णयाबाबत ते समजून सांगतील असेही सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्यानं सुपरमॉल्समध्ये वाईन विकण्याचा निर्णय चांगला असल्याचे सत्तार यांनी सांगितले.


नेमकं काय म्हणाले होते शंभूराज देसाई 


मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं होतं. मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको यासाठी मागील सरकारने लोकांकडून मते मागवली होती. ही मते प्राप्त झाली असून त्याचा अभ्यास सुरु असल्याचे देसाई म्हणाले होते. या धोरणासंदर्भात जनतेकडून मागवलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करुन लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी सांगितलं होतं. मागच्या सरकारच्यावेळी मंत्री असताना आम्ही संपूर्ण माहिती भाजप पक्षापर्यंत पोहोचवू शकलो नव्हतो. मात्र, यावेळी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं हे नवं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा होईल, याकडे आमचं लक्ष असल्याचे देसाई म्हणाले होते.


महत्त्वाच्या बातम्या: