Death Threat to Eknath Shinde Update: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देऊ असे धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारंवार शिवीगाळ करून टॉर्चर करणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून धमकीचा मेल पाठवल्याची कबुलीच आरोपींनी दिली आहे. (Mumbai)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवारी(20 फेब्रुवारी) देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने या प्रकरणाचा शोध घेत बुलढाणा पोलिसांच्या मदतीने कारवाई करत देऊळगाव येथून दोघांना ताब्यात घेतलं. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली. यात आपल्याला आवडणाऱ्या मुलीच्या मृत्यूला मित्रच जबाबदार असल्याचं सांगत टॉर्चर करणाऱ्या आरोपीनेच मोठ्या केसमध्ये अडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केल्याची कबुली आरोपीने दिलीय. (Crime News)
आरोपींनी काय दिली कबुली?
या गुन्ह्यात जामेलवरून ही धमकी देण्यात आली होती तो मोबाईल मंगेश वायाळचा होता. मंगेशने त्याचा मोबाईल अभय शिंगणे च्या घरी चार्जिंगला लावला होता. अभयचे एका मुलीवर प्रेम होते मात्र तिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूला अभयच जबाबदार असल्याचा मंगेशला संशय होता. तिच्या मृत्यूला अभय जबाबदार असल्याचं बोलत मंगेश सारखा अभयला टॉर्चर करायचा. याचाच राग मनात धरून अभयने मंगेशला मोठ्या केस मध्ये अडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाण्याच्या देऊळगाव येथून अटक केली होती. या दोघांचा ताबा पुढील तपासासाठी गोरेगाव पोलिसांकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. (Buldhana)
नक्की प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याचे धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा मेल करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये होता. या मेलवरून पोलिसांनी बुलढाण्यातून दोघांना अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोन्ही आरोपींना मुंबईत घेऊन जाण्यात आले. तपास यंत्रणांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर धमकीचे धक्कादायक कारण समोर आले.
हेही वाचा: