CET Exam Update: महाराष्ट्र राज्य CET सेलने विद्यार्थ्यांना त्यांचे MAH-CET अर्ज दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे . अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.


राज्य सीईटी सेलद्वारे या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. यंदा सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी एमएएच-सीईटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अर्ज करताना विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्रे, स्वाक्षरी, विषय गट निवडताना चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या चुका सुधारण्याची संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.


उच्च शिक्षण विभागाच्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी अर्जातही दुरुस्त्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना 29 जून आणि 6 ते 11 जुलैपर्यंत त्यांच्या चुका सुधारण्याची मुभाही देण्यात आली आहे.


या वेबसाइटवरून अर्ज करा
अर्ज करताना विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, छायाचित्रे, स्वाक्षरी, विषय गट निवडताना चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट (MHT CET 2022) अर्ज करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल – cetcell.mahacet.org आणि mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला. अर्जा सुधारणा करण्यासाठी अंतिम तारीख 30 जून आहे.


MHT CET या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक 


महाराष्ट्रात CET परिक्षा विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाची असते. याच परिक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्याची संधी मिळते. महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT CET ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यंदा महाराष्ट्र राज्य CET सेलने विद्यार्थ्यांना त्यांचे MAH-CET अर्ज दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे जे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना  फॉर्म मधील चुका दुरुस्त करण्याची मुभा मिळाली आहे.