Deadline extended again for 100 percent crop inspection: राज्यात 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश दिले आहेत. ई पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात आलेल्या ई पाहणीमध्ये 36 टक्के पिकांची नोंद करण्यात आली. पीक नोंदणी न झाल्यास नैसर्गिक आपत्ती, पिक विमा, पीक कर्ज या लाभांपासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई पिक पाहणी महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर 100 टक्के पीक पाहणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

अशी करा ई-पीक नोंदणी

ॲपद्वारे लॉगिन केल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा गट क्रमांक निवडावा. पिकांची माहिती जसे की पीक क्षेत्र, पेरणीची तारीख आदी काळजीपूर्वक भरावी. अ‍ॅपमध्ये आता ५० मीटरच्या आतून पिकांचा फोटो काढणे बंधनकारक आहे, जेणेकरून पिकाची अचूक माहिती मिळेल. एकदा माहिती जतन (सेव्ह) केल्यावर, ती आपोआप सातबारावर नोंदवली जाते. यामुळे शेतातील पिकांची नोंदणी अधिकृतपणे होते.

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement