Sharad Pawar: वस्तादांच्या संसदीय राजकारणाची साठाव्या वर्षांत एन्टी अन् सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे तो सेम फोटो शेअर करत नेमकं काय म्हणाल्या?
Sharad Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शरद पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा गौरव केला आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनाला आज (22 फेब्रुवारी) साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला. या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शरद पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोस्टमध्ये शरद पवारांचा सेम फोटो आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत… pic.twitter.com/w3oK1TYWY9
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 22, 2026
शरद पवारांनी सहा दशकांचा टप्पा गाठला
1967 साली सुरू झालेल्या जनसेवेच्या प्रवासाने आज सहा दशकांचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत पवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास जिंकला आहे. महाराष्ट्र विधानसभेत सहा वेळा सदस्य म्हणून, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत प्रतिनिधित्व करत त्यांनी संसदीय कारकीर्दीत भरीव कामगिरी बजावली आहे.
आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत… pic.twitter.com/rLkURdFVqV
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
साहेबांचे मार्गदर्शन पुढील काळातही नवी ऊर्जा देत राहो
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा पुढील काळातही नवी ऊर्जा देत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. त्यांनी या प्रवासात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले. सुप्रिया सुळे यांनीही पवार यांच्या सहा दशकांच्या अविरत प्रवासाचा उल्लेख करत, जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच हा अविजीत प्रवास शक्य झाल्याचे नमूद केले. जनतेच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















