Ajit Pawar : पक्षात नव्यांचा सन्मान केला जाईल, तर जुन्या लोकांचा मान राखला जाईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. पक्षात विकेंद्रीकरण करायचं आहे. सत्तेच विकेंद्रीकरण करायचं आहे असेही अजित पवार म्हणाले. जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहायक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार बोलत होते. अनेकांचे फोन सुरु होते की अभिजीत कुठे जाऊ नकोस आपण बसून बोलुयात, चर्चा करुयात मार्ग काढूयात. कधी मार्ग काढणार होते? एवढे दिवस काय गोट्या खेळत होते का? असा सवाल करत नाव न घेता अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगवला. 

आपला पक्ष सर्व धर्म समभाव विचारधारा घेऊन जाणारा आहे

सर्व धर्म समभाव विचारधारा घेऊन जाणारा पक्ष आहे. छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांच्यावर चित्रपट निघाला आहे. हा चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात. अतिशय चांगला चित्रपट बनवला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ठाणे जिल्ह्यात 6 महानगर पालिका आहेत. महायुतीला भर भक्कम पाठिंबा दिला आहे. भाजप त्यांचा पक्ष वाढवत आहे. शिवसेना त्यांचा पक्ष वाढवत आहे. आता आपल्याला देखील आपला पक्ष वाढवायचा आहे असे अजित पवार म्हणाले. अभिजीत बाबत बरीच माहिती होती, तो कुणासोबत काम करत होता हे मला माहिती आहे. तो आमचाच नातलग आहे. आता पवारच यायला उशीर करायला लागले तर मग बाकी कधी आपल्याकडे येतील असेही अजित पवार म्हणाले. अनेकांचे फोन सुरु होते की अभिजीत कुठे जाऊ नकोस आपण बसून बोलुयात, चर्चा करूयात मार्ग काढूयात. कधी मार्ग काढणार होते? एवढे दिवस काय गोट्या खेळत होते का?

अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

आम्ही राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहोत. आता राज्याला आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. ज्या पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहे असेही अजित पवार म्हणाले. निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, गणेश नाईक यासह असंख्य लोक राष्ट्रवादीत होते. ही लोकं केवळ एका व्यक्तीमुळं सोडून गेली आहेत, असं म्हणँत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला. मी अनेकवेळा वरिष्ठांना सांगितलं मात्र त्यांनी ऐकलं नाही. मी म्हणत होतो कुठे माशी शिकतेय हे तरी पाहा असेही अजित पवार म्हणाले. 

मला बुके देऊ नका शाल देऊ नका. पक्षाचे सभासद किती वाढवले ते सांगा

मला बुके देऊ नका शाल देऊ नका. पक्षाचे सभासद किती वाढवले ते सांगा असेही अजित पवार म्हणाले.  कुठलाच मतदार कायमचा नसतो. सातत्याने मतदार विचार करत असतो त्यामुळे मतदार जोडणी कार्यक्रम करा असेही अित पवार म्हणाले. 

 

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: अजित पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; बारामतीत पुन्हा केला पहाटेच कामाचा पाहणी दौरा, पुढचं नियोजन सांगत म्हणाले, 'जरा धीर धरा...'