Dattatreya Bharane : शेती परवडतच नाही, परवडतच नाही असे रडगाणे गायचे, पण शेती कोणाला परवडत नाही? मुंबईला (Mumbai) राहून शेती परवडणार नाही असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatreya Bharane) यांनी केलं आहे. शेतीत चढ-उतार होतातच, असेही ते म्हणाले. उच्चशिक्षित तरुण प्रयोगशील शेती करत असल्याचं उदाहरणही भरणे यांनी दिलं. कधीकधी अवकाळी पाऊस येतो. शेतीत कमी जास्त होते असेही ते म्हणाले. मुंबईला राहून शेती परवडणार नाही असेही भरणे म्हणाले.
पिकांचे वाण बदलले पाहिजे
मुंबईला (Mumbai) राहून शेती परवडणार नाही. कधीकधी अवकाळी पाऊस (Rain) येतो. शेतीत कमी जास्त होते. आपण नियोजन करुन नाविन्यपूर्ण प्रयोग (Innovative experiments) केले पाहिजे असे भरणे म्हणाले. पिकांचे वाण बदलले पाहिजे. उसाचे बेणं देखील बदललं पाहिजे. नवीन टनेज देणारे बेणे वापरले पाहिजे. कांद्याचे सोयाबीनचे कोणते बियाणे वापरले पाहिजे हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांची शिकलेली मुलं शेतात चांगल्या प्रकराचे पिकं घेत असल्याचे दत्रात्रय भरणे म्हणाले. यावेळी त्यांनी मनातील खंत व्यक्त करताना मला हलकं-फुलकं आवडतं तो आनंद गोड असतो असे ते म्हणाले.
दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं
सर्वजण सुखी नसतात, प्रत्येकाला कुठेतरी दु:ख असतं. मंत्र्यालाही किती वेदना असतात ते मला माहीत आहे. दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं असेही भरणे म्हणाले. जुन्नर तालुक्यातील पीडीसीसी बँकेच्या (PDCC Bank) शाखा उद्घाटन प्रसंगी भरणे बोलत होते. आयुष्यात आपल्याला जिथं जिथं संधी मिळते तिथं आपण संधीचं सोनं केलं पाहिजे असे भरणे म्हणाले. आनंद द्यायचा असतो आणि तो घ्यायचा असतो. पुढच्या माणसाला ज्यावेळी आनंद आपण देऊ, तेवढा उलटा दहापट आनंद आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही हा माझा पहिल्यापासूनचा अनुभव असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. जगात प्रत्येकजण सुखी नाही. दु:ख, टेन्शन, संकट प्रत्येकालाच आहे. महिला बघिनींना वाटले असेल की काय त्या मंत्र्यांची मजा आहे, पण माझं मन मलाच माहित आहे. शेवटी दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते असे भरणे म्हणाले. हसत राहा आनंदात राहा आणि माझंच बरं आहे असे सकारात्मक दृष्टीकोण ठेवा असेही भरणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: