Continues below advertisement

अहिल्यानगर : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ, राज्य सरकार कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्या एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, आमचे अधिकारी प्रत्येक शेतात जाणार अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray bhane) यांनी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पाहणी दौऱ्यात आश्वस्त केले. तर, अधिकाऱ्यांनो तुम्हाला पुण्य कमावयची ही संधी आहे, पंचनामे करताना दुजाभाव करू नका, अशा सूचनाही भरणे यांनी सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यातील सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर,बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नद्यांना पूर आलाय, तर बळीराजाची पीकं पाण्यात वाहून गेली आहेत. शेतात गुडघाभर पाणी साचलं असून, अनेक ठिकाणी मातीही वाहून गेलीय. त्यामुळे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी आणि विरोधकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने 2211 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यावेळी, बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, तर अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Continues below advertisement

पुण्य कमविण्याची संधी ( Dattatray bharane rain flood ahilyanagar)

अधिकाऱ्यांना पुण्य कमविण्याची ही संधी आहे, त्यामुळे पंचनामे करताना दूजाभाव करू नका. आपत्ती असली तरी या माध्यमातून पुण्य कमावण्याची संधी परमेश्वराने दिली आहे. प्रत्येक नुकसानीचे पंचनामे करा अशा सूचना कृषिमंत्री भरणे यांनी अहिल्यानगरमधील दौऱ्यातून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अतिवृष्टीचे संकट टळलेले नाही, राज्यात साधारण 83 लाख एकरांवर नुकसान झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 7 लाख 49 हजार शेती पिकांचे नुकसान झाले असून 80 टक्के नुकसान याच महिन्यात झालंय. नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागेल, आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देण्याचे काम करतोय. दिवाळीच्या आत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असा शब्द कृषिमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यातून दिला.

हेही वाचा

तीन दिवस आम्ही उपाशी, पुराचे गढूळ पाणी पिऊन दिवस काढले; सुटकेनंतर ग्रामस्थांचा संताप, डोळ्यात आनंदाश्रू