उस्मानाबाद : चोऱ्या, दरोडे, खून आदी पन्नासहून अधिक गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या एका कुख्यात अट्टल गुन्हेगारास दोन पोलिसांनी जीव धोक्यात घालून शिताफीने अटक केली. पण पोलीस स्टेशनमधून फरार झाला.
दादा काळे असे या कुख्यात दरोडेखोराचे नाव असून त्याच्यावर जबरी चोऱ्या, खून, दरोडे आदी 50 हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो मुंबईसह अनेक पोलिसांना हवा होता.
दोन दिवसांपूर्वी तो शिंगोलीजवळ आला असल्याची माहिती दोन पोलिसांना मिळाली होती. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून, मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. मात्र, आनंदनगर पोलिसांच्या हातावर तुरु देऊन हा गुंड पसार होण्यात यशस्वी झाला. त्यामुळे पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.
दरम्यान दादू काळेचा आनंदनगर पोलीस कसून शोध घेत आहेत.