COVID 19: कोरोना व्हायरसनं आता देशभरात पुन्हा एकदा डोकं वर काढला आहे .राज्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतानाचे चित्र असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत . कोरोना आपल्या सोबतच राहणार आहे .लोकांना पॅनिक होऊ देऊ नका .फक्त योग्य पद्धतीने काळजी द्या अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्यात . (Prakash Abitkar)
देशभरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 4000ंवर पोहोचली आहे .राज्यात सध्या 494 सक्रिय रुग्ण असून कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत .त्यामुळे जनतेने कोविडच्या वाढत्या रुग्णसंखेला घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे .
आरोग्यमंत्री काय म्हणाले ?
आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंखेवर प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत .ते म्हणाले , " पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंखेत वाढ होत असली तरी जनतेने घाबरून जाऊ नये असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं . या आधी देखील सांगितला आहे कोरोना वाढला तरी काळजीची गरज नाही .कोरोना आपल्या सोबतच राहणार आहे .आता आपली प्रतिकारशक्ती ही वाढली आहे .रुग्ण वाढत असले तरी फक्त कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही .सहव्याधी असलेल्यांचा मृत्यू झालाय .त्यामुळे येत्या काळात सहव्याधी असलेल्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे .केंद्राच्या सूचनेनुसार आपण काम करतोय .लोकांना पाणी होऊ देऊ नका .फक्त योग्य पद्धतीने काळजी घ्या .सहव्याधी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी .अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केल्यात .
देशभरात कोरोना रुग्णसंख्या किती?
देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव हळूहळू पुन्हा वाढत आहे. 4 जून 2025 पर्यंत भारतात 4,300 हून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण नोंदले गेले असून, गेल्या 24 तासांत सुमारे 300 नवीन रुग्ण आणि 7 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नवीन संक्रमितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या सहव्याधी असलेले रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
हेही वाचा: