एक्स्प्लोर

Nagpur News : नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरात देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीची निर्मिती केली जात आहे.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरात देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीची निर्मिती केली जात आहे. 158 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे जवळपास 60% काम पूर्ण झाले असून लवकरच संपूर्ण काम पूर्ण करून देशाचे गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांच्या उपस्थितीत या सर्वात उंच मूर्तीचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

कशी असेल देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती? (Tallest 158 foot Hanuman Statue in the Country)

- मूर्तीची एकूण उंची 158 फूट असेल. खालच्या चौथर्याची उंची सोडून मूर्तीची एकूण उंची 158 फूट इतकी असेल.

- आतापर्यंत देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती हिमाचल प्रदेशातील सोलन येथे असून ती 157 फुटाची आहे.

- नागपुरात निर्माण केली जात असलेली हनुमान मूर्ती प्रबलित सिमेंट काँक्रीट म्हणजेच RCC ची असेल.

- त्यामध्ये काही ठिकाणी फायबर प्रबलित प्लास्टिक म्हणजेच FRP वापरले जाईल.

- मूर्तीला भेगा प्रतिरोधक बनवण्यासाठी झिंक मेटलायझिंग केलं जाईल...

- तर मूर्तीच्या पृष्ठभागावर ऍक्रेलिक रंग केला जाईल.

- 158 फुटांची मूर्ती निर्माण करण्यासाठी तब्बल 1, 178 घनमीटर काँक्रीट तर 140 टन लोखंड वापरला जाईल...

- चौवथऱ्यापासून मुकुटापर्यंत मूर्तीचा एकूण वजन 2,981 टन एवढा राहील.

- मे 2026 पर्यंत मूर्तीचे निर्माण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

- ही उंच मूर्ती पाण्याच्या तळ्यात उभी राहणार असून अवतीभवती बोटिंग ची सोय केली जाणार आहे.

- परिसरात बटरफ्लाय गार्डन ही उभारले जाईल.

नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किमी अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तीपीठ आहे. इतर दिवसांच्या तुलनेत दरवर्षी आश्विन महिन्यातील नवरात्री आणि शारदीय नवरात्रोत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते. या दिवसात येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. महालक्ष्मी जगदंबा देवी भक्तांना दररोज तीन रुपात दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात सकाळी देवी कुमारिका रूपात असते, दुपारी देवी सुहासिनी रुपात असते तर संध्याकाळी देवी प्रौढ स्त्रीच्या रुपात दर्शन देते अशी आख्यायिका आहे. अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला या महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे नुकतेच नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.  त्यात आता देशासह जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती निर्माण केली जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Auto Rickshaw Permit : मोठी बातमी: राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget