नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मंत्री मुश्रीफांचं मोठं वक्तव्य
नगरपालिकेच्या निकालाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठं वक्तव्य केलं आहे. 21 तारखेच्या निकाला विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याची शक्यता असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
Hasan Mushrif Kolhapur : राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नगरपालिकेच्या निकालाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठं वक्तव्य केलं आहे. 21 तारखेच्या निकाला विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याची शक्यता असल्याचे मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे निकालाची तारीख आधी सुद्धा येऊ शकेल. पण आता तरी 21 डिसेंबर ही निकालाची तारीख असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
निकालाची तारीख आधी सुद्धा येऊ शकेल. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी पर्यटन करून यावे
21 डिसेंबर ही निकालाची तारीख दिली आहे. मात्र, निकालाची तारीख आधी सुद्धा येऊ शकेल. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी पर्यटन करून यावे असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 11 वर्षाच्या संघर्षाने दोन गट एकत्र आले आहेत. काही जणांची पूर्वी नाराजी होती. पण ती नाराजी आता दूर झाली आहे. या निवडणुकीमुळं आमच्या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळं कार्यकर्त्यांनी हाडाची काड करुन निवडणुकीत काम केलं आहे. सर्वच ठिकाणी निवडणूक सुरळीतपणे पार पडली. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतल्याचे मुश्रीफ म्हणाले.
तदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला
कोल्हापूर, नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नेते खर्डेकर चौकात एकत्र आले. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना पाहायला मिळाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारांना निकाल येईपर्यंत पर्यटन करुन यावं असा सल्ला दिला आहे. तर समरजितसिंह घाटगे यांनी विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुश्रीफ आणि घाटगे या युतीमुळं कागलच्या राजकारणात एक नवा ट्वीस्ट
मुश्रीफ आणि घाटगे या युतीमुळं कागलच्या राजकारणात एक नवा ट्वीस्ट निर्माण झालेला. दोन्ही नेत्यांची युती झाल्यापासून कागलमध्ये राजकीय शांतता पाहायला मिळाली. आजच्या मतदान प्रक्रियेतही काही अपवाद वागळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यामुळे कागलमधील आजच्या मतदान प्रक्रियेच वातावरण हे पूर्णपणे वेगळं होतं. दोन्ही नेत्यांनी निकालाची वाट पाहू असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
























