Cough Syrup News : मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांचे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. कोल्ड्रिप सिरप हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक वर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या औषधामधे डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Continues below advertisement

 मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या कप सिरपच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू

दरम्यान, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या कप सिरपच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचा समोर आलं आहे. राज्य सरकारकडून टोल फ्री क्रमांक नंबर 1800 222 365 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील विक्रेते वितरक आणि रुग्णालय यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो गोठवण्याच्या औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये 11 मुलांचा मृत्यू

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये जेनेरिक खोकल्याची औषधे (Generic Cough Syrup) घेतल्यानंतर तब्बल 11 मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ड्रग कंट्रोलर (Drug Controller) विभागाने तात्काळ कारवाई करत या औषधांच्या वापरावर बंदी घातली असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याशिवाय इतर अनेक मुलं या सिरपमुळे गंभीर आजारी पडल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. यापूर्वीही मध्यप्रदेशातील छिंदवाडामध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. राजस्थान सरकारने तातडीने तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे Dextromethorphan Hydrobromide Syrup IP 13.5 mg/5 ml या औषधाच्या 20 हून अधिक बॅचवर बंदी घालण्यात आली असून तपासणी सुरू आहे.

Continues below advertisement

काय आहे Dextromethorphan Hydrobromide Syrup?

1950 च्या दशकात शोध लागलेले हे औषध सुरुवातीला कोडेन (Codeine) याला पर्याय म्हणून वापरले गेले. हे मुख्यत्वे कोरड्या खोकल्यासाठी दिले जाते. याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूपर्यंत जाण्यापासून रोखणे, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. केमिकल प्रोसेसिंग हे औषध तयार केले जाते आणि लहान मुलांना सहजपणे प्यायला यावे म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिले जाते.

Cough Syrup News : पालकांसाठी सूचना

जर मुलाला किंवा रुग्णाला यापूर्वी लिव्हर (Liver), किडनी (Kidney) किंवा इतर गंभीर आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पालकांनी बाजारात सहज मिळणारे सिरप मुलांना देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर तपासावा.