औरंगाबाद : देशासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 95 वर पोहोचली आहे. एकट्या औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांत 42 रूग्णांची वाढ झाली आहे. त्यातील 6 जण 16 वर्षांखालील तर 7 जण 44 वर्षांखालील आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 26 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. असं असूनदेखील औरंगाबादमध्ये काही लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील 27 हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात 1 पोलीस आधिकारी, 2 कर्मचारी जखमी झाले आहेत.


पाहा व्हिडीओ : औरंगाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक; 27 हल्लेखोर अटकेत



बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी सामुहिक नमाद पठणासाठी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.


दरम्यान, औरंगाबात शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या 95 वर पोहोचली आहे. एवढचं नाहीतर एकट्या औरंगाबाद शहरात गेल्या तासांत 42 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एवढचं नाहीतर औरंगाबाद शहरात कोरोना व्यतिरिक्त सारीच्या साथीनेही थैमान घातलं आहे.


संबंधित बातम्या : 


कोरोनाच्या झटपट टेस्टसाठी प्रवरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान; अल्प खर्चात लवकर चाचणी


कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब