एक्स्प्लोर

मुंबईत 25 लाख मास्कचा साठा जप्त, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक

मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू परिसरात मास्कचा साठेबाजार करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख्य यांनी घटनास्थळ जात परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र याही परिस्थितीत काही जणांकडून अशा मास्कचा काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू परिसरात मास्कचा साठेबाजार करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 15-20 कोटींचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थिचीचा आढावा घेतला.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेतला तर मास्कची सर्वाधिक गरज डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेशी संबधित कर्मचाऱ्यांना आहे. मात्र असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कचा साठेबाजार कुणी केला आणि अजून मास्कचा साठा केलाय का याची माहिती आता पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मास्कच्या साठेबाजाराबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: लक्ष घालून ही मोठी कारवाई केली आहे.

परिस्थिताचा गैरफायदा घेऊ नका : अजित पवार

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वेगाने होत आहे, त्यामुळे राज्यातील आणि देशातील स्थिती गंभीर आहे. राज्यावर आणि देशावर आलेलं हे मोठं संकट आहे. याही परिस्थितीत लोकं पैसे कमावण्याचा विचार करत असतील तर ते अत्यंच चुकीचं आहे. यातून आपण कोणत्या थराला जाऊन विचार करतोय, हे लक्षात आलं पाहिजे. जर कुणी याही परिस्थितीत चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांचावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. त्याच्या दोन पिढ्यांना ही कारवाई लक्षात राहील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पैसा कधीही कमावता येतील, मात्र माणसाचा जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. त्यामुळे लोकांनी कृपया करुन असं वागू नका, परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका. लोकांपर्यत आहे तो माल कसा पोहोचले याचा विचार करा आणि सर्वांना सहकार्य करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 वर

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 101 वर पोहोचली आहे. पुण्यात तीन आणि साताऱ्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. काल संध्याकाळीही सांगलीत चार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 March 2024Kolhapur Loksabha Election 2024 : बंटी-मुन्ना कधी एकत्र येणार? जय-वीरुची  बुलेट राईड !!Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Embed widget