यवतमाळ : वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात मागील 3 दिवसापासून सापडत नसल्याने मृताचे नातलग चिंतेत आहेत.  मृतदेह सापडत नसल्याने आता नातलगांनी वैद्यकीय महाविद्यालय मध्ये बसून मृतदेह शोधून देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे .


रोशन ढोकने असे मृत व्यक्ती चे नाव असून त्याचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला. त्याचा मृतदेह मृत्यू झाल्याच्या  दुसऱ्या दिवशी मिळेल असे वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासनाने नातलगांना सांगितले मात्र आता तीन दिवस झाले तरी मृत रोशन ढोकने याचा मृतदेह कुठेच कुणाला सापडत नाही त्यामुळे नातलगांची चिंता वाढली आहे .


रोशनच्या नातलगांनी त्याचा मृतदेहाचा सर्वत्र शोध घेतला शवगृहात शोधले ,वार्ड वार्ड मध्ये शोधलं जिथं जिथं तो उपचार करिता दाखल होता सार शोधलं कुठेच मृत रोशनच्या मृतदेहाचा पत्ता लागत नसल्याने नातलग चिंतेत सापडले आहेतय सर्व वार्ड मध्ये शोधला तरी कुणालाच त्याचा नेमका मृतदेह कुठं आहे म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन यात काहीच सांगत नाही आणि त्यामुळे नातलगांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. अविवाहित असलेला रोशन हा नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे गावचा रहिवासी  घरातील कर्ता तरुण होता त्याच्या जाण्याने कुटुंबियांना हादरा बसला आहे .त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला प्रथम नेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये दाखल केले होते 


20 एप्रिलला रोजी दुपारी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय मध्ये उपचारासाठी त्यांना नातलगांनी आणले त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला प्रथम महाविद्यालयात चे फिवर opd मध्ये ठेवले आणि सांयकाळी त्यांना वैद्यकीय महाविद्यालय मध्येच वार्ड 25 आणले तेथेच 20 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 9.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला .रात्री 10.30 वाजेपर्यंत नातलगांना त्यांचा मृतदेह वार्डात दिसला आणि त्यानंतर उद्या रोशनचा मृतदेह शवगृहातुन घेऊन मृतदेह जावे असे वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासनाने नातलगांना सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी नातलग वैद्यकीय महाविद्यालय मध्ये पोहचले मात्र त्याचा मृतदेह कुणालाच सापडला नाही.




रोशनचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले असे रुग्णालयातील प्रशासनाने सांगितले. मात्र आता 3 दिवस झाले तरी मृत व्यक्तीचा मृतदेह काही कुणालाच सापडत नाही. त्याचा मृतदेह शवगृहात शोधला मृतदेह तेथे सापडला नाही रोशन ढोकने यांना कोरोना नव्हता त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असे नातलगांनी म्हटले आहे.


रोशनचा मृतदेह सापडत नसल्याने नातलगांनी यवतमाळ च्या शहर पोलीस स्टेशन मध्ये त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तर यावर पोलीससुद्धा काहीच प्रतिक्रिया देत नाही तर वैद्यकीय महाविद्यालयचे अधिक्षक डॉ सुरेंद्र भुयार यांना या बद्दल विचारणा केली असता रोशनचा मृतदेह सापडत नसल्याने 4 वेळा शवविच्छेदन कक्षात आणि सर्व हॉस्पिटलमध्ये तेथील वार्ड शोधून झाले तरी मृतदेह काही सापडला नाही त्यामुळे आता मृतदेह सापडत नसल्याने चौकशी समिती गठीत केली असल्याचे त्यांनी सांगितले मात्र कॅमेरा समोर बोलण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.


 


त्यामुळे एकूण संपूर्ण प्रकरण गंभीर असून मृत रोशनचा मृतदेह कुठं गेला याचा अजूनही थांगपत्ता लागत नसल्याने नातलग मात्र रुग्णालयात च्या रोशनचा मृतदेह शोधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मध्ये त्याचा रोज शोध घेत येरझारा मारत आहेत  त्यामुळेच कंटाळून आता नातलगांनी वैद्यकीय महाविद्यालय मध्ये बसून रोशन चा मृतदेह शोधुन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे आता रोशनचा मृतदेह कुठं असेल याची सर्वाना चिंता लागली आहे .