Cooperative Society Elections : सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (Cooperative Society Elections) मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकांबाबत सहकार विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळं सहकार विभागानं हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अवेक ठिकाणी वाहतुकीवरक परिणाम झाला आहे.तसेच वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय?
राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात निवडणूक प्राधिकरणाने म्हटले की, ‘राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊनं ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था, तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय/मा. खर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 मधील नियम 4 मध्ये नमुद केलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता या निवडणुका 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या काही काळापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: