लोकांचा सहकारावरील विश्वास उडालाय: सहकारमंत्री सुभाष देशमुख
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 08:57 AM (IST)
सांगली: सहकार क्षेत्रावर लोक अविश्वास दाखवतात. लोकांचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी सरकार सोर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देखमुख यांनी दिली. सहकार क्षेत्राला लागलेल्या आजाराला संपवण्यासाठी चांगला डॉक्टर आणि चांगल्या औषधाची गरज आहे. हा आजार संपवण्यासाठी ऑपरेशन करण्याची आता वेळ आली असून लवकरात लवकर आम्ही ऑपरेश करु आणि सहकार क्षेत्राला पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. सांगलीत महाराष्ट्र शासनाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.