वादग्रस्त IPS अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची औरंगाबादला बदली
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2018 06:13 PM (IST)
क्लिप वायरल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.
बीड : अनुसूचित जातींच्या लोकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांची अखेर औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. कथित व्हायरल क्लिपमध्ये "अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांनी केले आहे. क्लिप वायरल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. या वायरल व्हिडीओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणाचा तपास हा बीडबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.