Nana Patole : जगातील आणि देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार (Corruption) नोटबंदीच्या (Demonetisation) काळात झाला आहे. ते पैसे भाजपच्या घरात गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पटोलेंनी भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार हल्लाबोल केला. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बदनाम केले, पण आता लोकांना वास्तव काय ते लक्षात आलं असल्याचे पटोले म्हणाले.


महात्मा गांधींप्रमाणेच राहुल गांधींचा मार्गही अहिंसेचा 


काँग्रेसची भूमिका कधीही अतिरेकी राहिलेली नाही. काँग्रेस हा अहिंसेला मानणारा पक्ष आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी यांचा मार्गही अहिंसेचा असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असल्याचे ते म्हणाले. अहिंसेच्याच मार्गाने देशाला पुढे नेता येतं, देशाला महासत्ता बनवता येतं असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. यावेळी मोदी सरकारवर (Modi Govt) त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अतिरेकी भूमिका कधीही घेणार नाही. राहुल गांधी ज्या वाटेनं निघाले आहेत, तो अहिंसेचाच मार्ग असल्याचे पटोले म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना पटोले यांनी नोटबंदीच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली.


भारत जोडो यात्रेमुळं  देशाला उभारी मिळणार 


लोकांना आता राहुल गांधी म्हणजे काय हे लोकांना कळायला लागलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत सामान्यातील सामान्य लोक, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही असे लोकही येत असल्याचे पटोले म्हणाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर कितीही भाजपने टीका करु द्या त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. यात्रेमुळं देशाला उभारी मिळणार आहे. ही यात्रा जनतेची झाली आहे. त्यामुळं निश्चितच परिवर्तन होऊन देशाला फायदा मिळेल असे नाना पटोले यावेळी म्हणाले.  दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी यांचा राजकीय प्रवेश कधी होणार याबाबत देखील नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, त्या सध्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्या राजकीय क्षेत्रातच आहेत, त्यामुळं त्यांचा राजकीय प्रवेश झालेला असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Tata AirBus Project: शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; नाना पटोले यांची बोचरी टीका