मुंबई : राज्यसभेकरता कॉंग्रेसचा उमेदवार उद्या फायनल होणार आहे. उद्याच फॉर्म भरला जाण्याची देखील  शक्यता आहे. कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे. उद्या मुंबईत फॉर्म भरल्यानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीत हायकमांडला भेटायला जाणार आहे. नाना पटोले, अशेक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अमित देशमुख दिल्लीत दुपारनंतर पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेतय 


राज्यसभेकरता तरुणांना संधी देण्याचा कॉंग्रेसचा मानस आहे. उदयपूर चिंतन शिबिरात देखील तरूणांना संधी देण्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे इम्रान प्रतापगडींसोबत कन्हैय्या कुमार, बी.व्ही श्रीनिवास यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, कॉंग्रेसच्या गोटातून इम्रान प्रतापडींचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. 


कोण आहेत इम्रान प्रतापगडी?



  •  उत्तर प्रदेशातील 34 वर्षीय मुस्लिम तरुण चेहरा 

  •  उर्दू कवी अशीही ओळख 

  • कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष

  • कॉंग्रेसमधील राहुल गांधी यांच्या तरुण फळीतील विश्वासू सहकारी

  • उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याबरोबर प्रचार केला


काँग्रेसच्या 'या' नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे 



  • पी चिदंबरम 

  • जयराम रमेश 

  • अंबिका सोनी 

  • छाया वर्मा 

  • प्रदीप टमटा 


देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.


 राज्यसभेसाठी शिवसेनेपाठोपाठ भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोडेंना उमेदवारी  जाहीर केली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अद्याप याबाबत काहीही अधिकृत माहिती दिली नाही.


संबंधित बातम्या :


Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार? भाजपकडून धनंजय महाडिक अर्ज भरण्याची शक्यता