मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत आला तरी काँग्रेसचे नाराजीनाट्य संपत नाही असं दिसतंय. काँग्रेस कधी आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराज असते तर कधी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांवर नाराज असतात.


सध्या काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत असं चित्र निर्माण झाल्याचं दिसतंय. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. नंतर त्यांना प्रदेशाध्यक्षव पदाची जबाबदारी देण्यात आली. आता नाना पटोले याना मंत्रीपदाची अपेक्षा देखील आहे असं सांगितलं जातंय. त्यातही ऊर्जा विभागाकडे त्यांचं लक्ष असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. 'ऊर्जा' विभागाबाबत नाना पटोले यांनी पण अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले होते.


पण त्यामुळे आता नितीन राऊत नाराज असल्याची माहिती मिळत आहे. नितीन राऊत यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी तक्रार केल्याची चर्चा होती. त्यावेळी नितीन राऊतांना दिल्ली वारी करावी लागली होती. आपल्या विरोधात प्रदेशाध्यक्षांच्या गटातून वातावरण तापवल जात असल्याची चर्चा नितीन राऊत गटात सुरु आहे. 


Antilia Explosives Scare  | स्पोटक प्रकरणात NIA ला राज्याचे संपूर्ण सहकार्य, अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार: गृहमंत्री अनिल देशमुख


नितीन राऊत यांच्या बंगल्यावर केलेल्या खर्चावरुन भाजपने आरोप केलेत. एकीकडे पक्षातील एक गट नितीन राऊत यांच्या विरोधात काम करतोय, त्याचवेळी विरोधी पक्षही राऊतांवर आरोप करत आहेत. या सगळ्या प्रकारावरुन एकूणच नितीन राऊत अडचणीत आल्याचं पहायला मिळतंय. 


एबीपी माझाशी बोलताना मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या विरोधात कोण बातम्या देत आहे हे पाहिलं पाहिजे असं सांगत असल्या या बातम्यांमुळे आपलं मंत्रिपद जाणार नाही असंही स्पष्ट केलं. 


एकूणच सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, काँग्रेसमधील गटा-तटाचे राजकारण नेहमी सुरूच असते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मंत्री पदावरून आता पक्षात वाद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


Nitin Raut | मला चांगली राहणीमान आवडते, माणसाने लॅविश राहू नये का? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं विरोधकांना प्रत्युत्तर